पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारयांची                  हिटलरशाही राजवट....





     मुंबईत कोरोना रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे अशा परिस्थितीत मुंबई पोलिस  स्वताचा जीव धोक्यात घालून 24 तास ड्युटी बजावत आहेत .परंतु मुंबई उपनगरातील उत्तर प्रादेशिक विभागातील  सर्व  पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असणारया पोलिस कर्मचारी  वर्गाला येथील वरिष्ठ अधिकारया कडून मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचे काम चालू आहे कोरोना रोगाच्या प्रादुर्भावा मुळे मा . मुख्यमंत्री साहेबांनी सर्व  राज्य शासकीय कर्मचारयांना  कार्यालयात 5% हजेरी लावण्यासाठी सांगितले आहे । पोलिसांना जीव नाही आहे काय ? त्यांना त्यांचे कुटुंब नाही काय ? परंतु असे असूनही पोलिस दल 100 % हजेरी देऊन  24 तास सुरू आहे । परंतु मुंबई पोलिस दलातील ऊत्तर प्रादेशिक विभागाचे (मालाड, मालवणी ,कांदिवली ,बोरीवली ,दहिसर , कुरार व इतर पोलिस स्टेशन ) वरिष्ठ पोलिस अधिकारी  तेथील पोलिस कर्मचारी वर्गाला कामाचा अतिरिक्त ताण देऊन मानसिक व शारीरिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच सर्वात लाजिरवाणा प्रकार म्हणजे एका पोलिस स्टेशन मधील शासना तर्फे पोलिस कर्मचारी वर्गाला पुरविण्यात आलेले  सॅनिटायजर , मास्क , मालाड पोलिस स्टेशन मधील कर्मचारी  वर्गाला न देता तेथील  वरिष्ठ पोलिस  अधिकारी  स्वताचा घरी घेऊन जात आहेत ! देशात चालू असलेल्या लाॅक डाऊन मुळे रेल्वे व इतर प्रवासी वाहतूक बंद असल्याने तसेच मुंबईत कोरोना रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने मुंबई पोलिस दलात दक्षिण , मध्य , पश्चिम , पुर्व प्रादेशिक विभागातील पोलिस स्टेशन मध्ये तेथील वरिष्ठ अधिकारया मार्फत पोलिस कर्मचारयाना ताण होऊ नये म्हणून  12 तास ड्युटी 24 सुट्टी, 24 तास ड्युटी 24 सुट्टी असा उपक्रम राबविण्यात येत आहे परंतू मुंबई पोलिस दलात उत्तर प्रादेशिक विभागातील ( मालाड , मालवणी , दहिसर , बोरीवली , कुरार , कांदिवली तसेच इतर ) पोलिस स्टेशन येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी हिटलरशाही नियम राबवून तेथील पोलिस कर्मचारी वर्गाचे मानसिक खच्चीकरण करत आहे । त्यातच शासनाने  पोलिसांना  ७५ % पगार देऊन  ३५ % पगार कपात केलेला आहे त्यामुळे पोलिसांच्या मनोबला विपरीत परिणाम होऊन नैराश्य निर्माण झाले आहे । तसेच वरील हिटलरशाही प्रकारा मुळे त्यात अजून भर पडणार आहे जर पोलिसांचे मानसिक व शारीरिक खच्चीकरण होऊन नैराश्य निर्माण होण्यात भर पडत असेल तर ही भविष्यातील धोक्याची घंटा म्हणावी लागेल दलात अशी चर्चा  आहे  ? 

Share To:

Post A Comment: